Home About Us Contact Us Log in  

ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी सूचना

१) जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

२) आपण ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्यासाठीच्या जाहिरातीत दिलेल्या पदाच्या पात्रता तपासा.

३) अर्जांची आवश्यक माहिती भरल्यानंतर प्रणाली प्रवेश आयडी, पासवर्ड आणि एसबीआय चलन तयार करेल व आपल्याला पडद्यावर दिसेल. आपणास एसएमएस द्वारे आपण दिलेल्या मोबाईल वर आपले लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.(एसएमएस द्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी योग्य मोबाइल नंबर प्रविष्ट करा.) आपला फॉर्म क्रमांक लॉगिन ID राहील. त्यानंतर एसबीआय चलनाची प्रिंट घ्या.

४) पुढील कार्यालयीन दिवशी जवळच्या एसबीआय बँकेला भेट द्या. अर्ज फी व बँकेचे शुल्क रोखीने भरा. बँक अर्ज फी स्वीकारून एसबीआय बँक अर्जदाराच्या चलनाच्या कॉपीवर पोहोच देईल. ती प्रत आपल्याकडे जपून ठेवा. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. पुढच्या कार्यालयीन दिवशी आपण आपला परिपूर्ण अर्ज भरू शकता.

५) ऑनलाइन अर्ज भरताना, सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या जवळ ठेवा. इंग्रजी मध्ये अर्ज भरा. आपल्या अलिकडच्या पासपोर्ट आकाराचा फोटोची स्कॅन प्रतिमा व सहीची स्कॅन प्रतिमा आपल्या सोबत असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरताना स्वाक्षरी व फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

६) अर्जदाराने पुढील माहिती भरणे आवश्यक आहे. वैयक्तिक माहिती, आरक्षण तपशील, पात्रता तपशील, फोटो आणि सही व स्कॅन प्रत अपलोड करा. इतर आवश्यक माहिती भरा.

७) ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता गूगल क्रोम या ब्राउझरचा उपयोग करावा.

८) उमेदवाराने स्कॅन केलेले स्वतःचे सध्याचे 35 मी.मी. X 45 मी.मी. आकारातील फोटो (.jpg) (साईज 100 KB पेक्षा जास्त नसावी). अपलोड करावयाचे आहे. त्याचप्रमाणे स्वतःची सही 15 मी.मी. X 35 मीमी. आकाराची (.jpg) अपलोड करावयाची आहे.

९) उपरोक्त सर्व माहिती भरल्याशिवय आपला फॉर्म पूर्ण होणार नाही. फॉर्म मध्ये भरलेली माहिती मंजूर करून सेव करा. आपल्या संदर्भासाठी अर्जाची प्रिंट घ्या. याप्रमाणे आपली अर्ज प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

१०) नियमित अद्यतनांसाठी वेबसाइट तपासा. परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र संकेतस्थळावर लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून उपलब्ध होईल.


                                                             Apply online Here
(ऑनलाईन अर्ज भरा)